Raigad News – रोहा शहरातील रासायनिक कारखान्यात स्फोट, दोन कामगार ठार; चार जण जखमी

Raigad News – रोहा शहरातील रासायनिक कारखान्यात स्फोट, दोन कामगार ठार; चार जण जखमी

रायगडमध्ये एका रासायनिक कारखान्यात गुरुवारी सकाळी स्फोट झाला. या स्फोटात दोन कामगार ठार झाले तर चार जण जखमी झाले. रोहा शहरातील साधना नायट्रो केम लिमिटेडमध्ये ही दुर्घटना घडली.

रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यातील केमिकल प्लांटच्या स्टोरेज टँकमध्ये स्फोट झाला. यात दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

स्फोटात जखमी झालेल्या कामगारांना उपचारासाठी रोहा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत कामगारांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;