भाजप म्हणजे भारतीय जनतेचा पाकिटमार, महाराष्ट्रभर लागले फडणवीसांचे पोस्टर्स

भाजप म्हणजे भारतीय जनतेचा पाकिटमार, महाराष्ट्रभर लागले फडणवीसांचे पोस्टर्स

महागाईपासून सुटका करणार अशी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजपच्या गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात वाढलेल्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईमुळे जनता जेरीस आली आहे. एकीकडे जनता महागाईने त्रस्त असताना भाजपचे नेते मंडळी मात्र मस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यावरून सध्या भाजप सरकारवर जोरदार टीका होत आहे.

दरम्यान महाराष्ट्रात सध्या एकीकडे गणेशोत्सव साजरा होत असताना राज्यभरात लागलेल्या काही पोस्टर्सनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे पोस्टर्स भाजपवर टीका करणारे असून त्यातून फडणवीसांना पाकीटमार दाखवण्यात आले आहे. महागाईवर भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करणारी व्यंगचित्रे संपूर्ण महाराष्ट्रात लावण्यात आली आहेत. ही पोस्टर्स मुंबई, पुणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नागपूर, हिंगोली, नगर आणि राज्यातील विविध भागात लागली आहेत. काही जिल्ह्यांमध्ये भाजपच्या कार्यालयांसमोर ही पोस्टर लावण्यात आली आहेत. भिंतीवर, सार्वजनिक वाहनांवर ही पोस्टर्स लागली आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;