मिंधे सरकारने ST कर्मचाऱ्यांना फसवलं! पगारवाढ 2020 पासून नाही तर, 2024 पासून मिळणार; श्रीरंग बरगेंचा संताप

मिंधे सरकारने ST कर्मचाऱ्यांना फसवलं! पगारवाढ 2020 पासून नाही तर, 2024 पासून मिळणार; श्रीरंग बरगेंचा संताप

राज्यातील महायुती सरकारने हजारो एसटी कर्मचाऱ्यांना फसवणूक केल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी संप केला होता. यानंतर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन सर्व कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरसकट 6500 रुपयांची पगारवाढ एप्रिल 2020 पासून देणार असल्याचे सांगितले होते. पण ही पगारवाढ एप्रिल 2020 पासून नाही तर, सप्टेंबर 2024 पासून लागू होणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांची ही घोर फसवणूक आहे. 2024 पासून पगारवाढ देऊन सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, असा संताप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री आणि मंत्री उदय सामंत यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर एसटी कर्मचारी संघटनांच्या 23 प्रमुखांची बैठक झाली होती. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांना मूळ वेतनात 6500 रुपयांची घसघशीत वाढ करण्याची घोषणा झाली. विशेष म्हणजे 2020 पासून ही पगारवाढ लागू होईल, असे सांगितले होते. पण आता ही पगारवाढ 2024 पासून देण्यात येणार असल्याचे काँग्रेसच्या एसटी कर्मचारी संघटनेचे नेते श्रीरंग बरगे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे एप्रिल 2020 पासूनच पगारवाढ लागू व्हायला हवी होती. दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ती लागू झाली असती तर साधारण 3200 कोटी रुपयांच्या रकमेचा फरक एसटी कर्मचाऱ्यांना मिळाला असता. पण मिनिट्स काढताना एसटीची आर्थिक परिस्थिती सुधारल्या नंतर फरक दिला जाईल, असे स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ सरकारने आपला शब्द फिरवला आहे. एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक केली आहे, असे श्रीरंग बरगे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;