पुण्यातील ढोल ताशा पथकांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयाला स्थगिती

पुण्यातील ढोल ताशा पथकांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयाला स्थगिती

पुण्यातील ढोल ताशा पथकातील सदस्यांच्या संख्येवर राष्ट्रीय हरित लवादाने घातलेल्या बंधनांवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणली आहे. देशाचे सरन्यायधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने पुण्यातील ढोल ताशा पथकांना मोठा दिलासा दिला आहे. ”ढोल ताशा हे पुण्याच्या हृदयात आहे. करू दे त्यांना काय करायचे ते”, असे सांगत चंद्रचूड यांनी हरित लवादाच्या या निर्णयावर स्थगिती आणली.

पुण्यातील ढोल ताशा पथकात मानाच्या गणपतीची निघणारी मिरवणूक ही जगभरात प्रसिद्ध आहे. या मिरवणूका बघण्यासाठी दूर दूरहून भाविक पुण्यात येत असतात. मात्र या ढोल ताशा पथकांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदुषणावर रोख आणण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने पुण्यातील ढोल ताशा पथकांना काही नियम अटी घालून दिल्या होत्या. त्यानुसार ढोल ताशा झांज पथकात 30 पेक्षा जास्त सदस्य असू नयेत तसेच त्यांच्याकडून होणाऱ्या ध्वनी प्रदुषणावर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते. तसेच राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्यास पथकाचे साहित्यही जप्त करण्याचे आदेश देण्यात आले होते.

 या याचिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायाधीश जे. बी. पारदीवाला, मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर गुरूवारी दुपारी सुनावणी पार पडली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;