Pune News – पतीने नवीन मोबाईल दिला नाही, पत्नीने थेट जीवनच संपवले

Pune News – पतीने नवीन मोबाईल दिला नाही, पत्नीने थेट जीवनच संपवले

पतीने नवीन मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून पत्नीने आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. शिवानी गोपाळ शर्मा असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

शिवानीची घरची परिस्थिती बेताची आहे. तिचा पती गोपाळ हा एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. शिवानी नवीन मोबाईल घेऊन देण्यासाठी गोपाळकडे हट्ट करत होती. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्याला पत्नीचा हट्ट पूर्ण करता येत नव्हता.

मोबाईल न मिळाल्यामुळे शिवानी नाराज झाली. बुधवारी पती कामावर गेल्यानंतर शिवानीने राहत्या घरी आत्महत्या केली. पती संध्याकाळी कामावरून घरी आल्यानंतर ही घटना उघड झाली. यानंतर वाकड पोलिसांना माहिती देण्यात आली. वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;