अंकिता लोखंडे पोहोचली लालबागच्या राजाच्या दर्शनाला, अंकिताच्या त्या कृतीवर संतापले लोकं

अंकिता लोखंडे पोहोचली लालबागच्या राजाच्या दर्शनाला, अंकिताच्या त्या कृतीवर संतापले लोकं

अंकिता लोखंडे सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटींपैकी एक आहे. तिचे व्हिडिओ आणि फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलीकडेच अंकिताने बिग बॉसच्या स्पर्धकांसोबत गणपतीची पूजा केली आणि त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. पण त्यानंतर आता अंकिता लालबागच्या राजाच्या दर्शनाला आली होती. ज्याचा व्हिडिओ लगेच व्हायरल झाला. अंकिता थोडावेळ तिथेच थांबून श्रीगणेशाचे पाय दाबू लागली. या गोष्टीनंतर इतर लोक संतापले. सोशल मीडियावर लोकं अंकिताला ट्रोल करु लागले आहेत. अंकिता लोखंडे हिने आपल्या कुटुंबासह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. पण जेव्हा ती बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर पाय दाबू लागले तेव्हा लोकांनी तिला ट्रोल केले. जरी ती हे काम श्रद्धेने आणि भक्तीने करत असली तरी तिच्या मागे उभ्या असलेल्या लोकांना तिच्यामुळे गर्दीचा सामना करावा लागला. सेलिब्रिटींमुळे सर्वसामान्यांना समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे लोकांनी म्हटले.

अंकिता लोखंडे पोहोचली लालबागच्या राजाच्या दर्शनाला

अभिनेत्रीने गणेश चतुर्थी सेलिब्रेशनसाठी तिच्या बिग बॉस मित्रांना तिच्या घरी आमंत्रित केले होते. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. दोघांनी एकमेकांबद्दल आदर दाखवला आणि अभिषेकने अंकिताच्या पायाला स्पर्शही केला. लाल साडीत अंकिता अतिशय सुंदर दिसत होती आणि अभिषेकने काळ्या रंगाचा एथनिक सेट परिधान करून या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

फोटोंमध्ये अंकिता अभिषेक, आयशा खान, खानजादी आणि समर्थ जुरेलसोबत पोज देताना दिसत आहे. प्रत्येकाने पारंपारिक कपडे परिधान केले होते. अंकिताची आई देखील एका फोटोत दिसत आहे. अंकिताचा पती विकी देखील बिग बॉस 17 मध्ये सहभागी झाला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;