सलमान खान याने घातले 167 कोटींचे घड्याळ, 700 पेक्षा अधिक हिरे, व्हिडिओ झाला व्हायरल

सलमान खान याने घातले 167 कोटींचे घड्याळ, 700 पेक्षा अधिक हिरे, व्हिडिओ झाला व्हायरल

रिलायन्स समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याला घड्याळाची खूप आवड आहे. त्यांच्याकडे 18 कोटींचे एक घड्याळ आहे. त्यामुळे त्या घड्याळाचे कौतूहल केले गेले. अनंत अंबानी यांच्या प्रीवेडींगमध्ये जगभरातील दिग्गजाचे लक्ष त्या घड्याळाकडे गेले होते. त्यानंतर सोशल मीडियावर त्या घड्याळाची चर्चा होत होती. परंतु आता सोशल मीडियावर सलमान खान याने घातलेले घड्याळ चर्चेचा विषय बनली आहे. सलमान खान याने घातलेले घड्याळ 20 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 167 कोटी रुपयांचे आहे. सलमान याने घातलेल्या या घड्याळ्याचा व्हिडिओ स्वत: अमेरिकन ज्वेलरी डिझायनर जॅकब अराबो याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सलमान खान याने घातलेल्या घड्याळात 700 पेक्षा जास्त हिरे आहेत.

सलमान खानचे केले कौतूक

लग्झरी घड्याळ आणि ज्वेलरी ब्रँडचे संस्थापक अरबो यांनी सोशल मीडियावर एक क्लिप शेअर केली आहे. त्यामध्ये सलमान खानच्या मनगटावर ते स्वत: आलिशान घड्याळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये हे मौल्यवान डायमंड घड्याळ घातल्यानंतर, सलमान त्याचे मनगट देखील दाखवताना दिसत आहे. हे घड्याळ खूप चमकत होते. जॅकब यांनी पोस्टमध्ये सलमान खानचे कौतूक केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jacob Arabo (@jacobarabo)

जॅकेब याने पोस्ट करत म्हटले…

जॅकेब अराबो यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘मी कधीही कोणाला माझे अब्जाधीश किंमतीचे हे घड्याळ परिधान करू दिलेले नाही. मात्र सलमान खान या बाबतीत अपवाद आहे. घड्याळ खास ‘बिलियनेअर’ कलेक्शनचा एक भाग आहे. या घड्याळ्याची भव्यता आणि त्याच्या विक्रमी किंमतीमुळे ती जगभर नावजली गेली आहे.

salman khan

सलमान खानच्या चाहत्याकडून प्रतिक्रिया…

सलमानच्या चाहत्यांनी या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने म्हटले आहे की, सलमानने हे घड्याळ घातले त्यामुळे हे घड्याळ अनमोल झाले आहे. दुसऱ्या युजरने लिहिले आहे, हे घड्याळ किंमती आहे. कारण ते सलमान खान याने परिधान केले आहे. सलमान खान बॉलीवूडचा बादशाह आहे. सलमान हा भारताचा ब्रँड आहे, असे आणखी एका चाहत्याने म्हटले आहे. त्या पोस्टवर सलमान खानच्या चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;