Palghar News – नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार, तिघांना अटक

Palghar News – नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार, तिघांना अटक

नोकरीचे आमिष दाखवून तिघांनी एका 30 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना नालासोपारा येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी आचोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

पीडित महिलेला नोकरीची गरज होती. त्यामुळे नोकरी देण्याच्या बहाण्याने एका आरोपीने तिला 2 सप्टेंबर रोजी नालासोपारा येथील आपल्या घरी बोलावली. मग तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने तिला आणखी दोघांच्या घरी पाठवली. तेथेही तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

घडल्या प्रकाराबाबत कुठेही वाच्छता केल्यास पुन्हा बलात्कार करण्याची धमकी आरोपींनी महिलेला दिली. रविवारी महिलेने आचोले पोलीस ठाणे गाठत घडला प्रकार कथन केला. यानंतर सर्व घटना उघडकीस आली. आचोले पोलिसांनी तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;