Pune News – उधार औषधं दिली नाही म्हणून मेडिकल मालकावर चाकू हल्ला, आरोपी अटक

Pune News – उधार औषधं दिली नाही म्हणून मेडिकल मालकावर चाकू हल्ला, आरोपी अटक

उधार औषधे दिली नाही म्हणून मेडिकल मालकावर चाकूने हल्ला केल्याची घटना पुण्यात घडली आहे. या हल्ल्यात मेडिकलचा मालक गंभीर जखमी झाला आहे. हडपसर येथील फुरसुंगी गावात ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मनोज अडागले असे अटक आरोपीचे नाव आहे.

फुरसुंगी गावातील आरोपी मनोज अडागले हा मंगळवारी एका मेडिकल स्टोरमध्ये औषधे आणायला गेला होता. त्याने काही औषधे घेतली. दुकानदाराने औषधांचे पैसे मागितले असता त्याने नंतर देतो असे सांगितले. मात्र दुकानदाराने उधार औषधे द्यायला नकार दिला. यामुळे मनोज संतापला आणि दुकानदाराला मारहाण करण्यास सुरवात केली.

यानंतर मनोजने शेजारच्या भाजीवाल्याकडील चाकू घेतला आणि दुकानदारावर हल्ला केला. यानंतर आरोपी पसार झाला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;