Kareena Kapoor Khan : माझ्या नवऱ्याला मी सेक्सी वाटते, मला बोटॉक्सची गरज नाही , बेबोने बिनधास्त सांगितलं

Kareena Kapoor Khan : माझ्या नवऱ्याला मी सेक्सी वाटते, मला बोटॉक्सची गरज नाही , बेबोने बिनधास्त सांगितलं

बॉलिवूडच्या नामवंत अभिनेत्री पैकी एक असलेल्या करीना कपूरने अभिनयाचं नाणं वेळोवेळी खणखणीत वाजवलं आहे. अनेकविध भमिका साकारून तिने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलंय. एकीकडे ग्लॅमरस भूमिका साकारतानाच तिने नॉन-ग्लॅमरस रोलही सहजतेने केलेत. अभिनयाप्रमाणेच करीना ही तिच्या बिनधास्त वागण्यामुळे, वक्तव्यांमुळेही ओळखली जाते. सध्या करीना तिच्या ‘द बकिंघम मार्केट्स’ या आगामी चित्रपटाच्या रिलीजमुळे व्यस्त असून त्याची ती निर्मातीदेखील आहे. यामध्ये तिने गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना खूप आवडलाय.
नेहमी स्पष्ट बोलणारी करीना ही चाहत्यांनाही खूपच आवडते.

करीना आता 44 वर्षांची झाली असली तरी तू अजूनही खूप फिट आहे. मूळची पंजाबी असल्याने तिच्या चेहऱ्यावर नेहमी तेज दिसतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान ती बोटॉक्स, फिलर सर्जरी बद्दल बोलली. मला या सगळ्याची ( बोटॉक्सची) गरज नाही, असं तिने स्पष्टचं सांगितलं. करीना नक्की काय म्हणाली , चला वाचूया.

काय म्हणाली करीना ?

मी सुरूवातीपासूनच टॅलेंटवर काम मिळवलं, मेहनतही खूप केली. मी नेहमी स्वत:ची नीट काळजी घेतली, फिट राहिले. वय हा सौंदर्याचा भागच आहे. तुम्ही कायम तरूण दिसण्यासाठी प्रयत्न करु नयेत. त्यापेक्षा आहे ते वय एन्जॉय करा. मी ४४ वर्षांची आहे आणि मला याआधी इतकं छान कधीच वाटलं नसेल. मला बोटॉक्स किंवा कोणत्याही स्कॉटिश रिफॉर्मेशनची गरज वाटत नाही. माझ्या पतीला मी सेक्सी वाटते आणि माझे मित्र म्हणतात की मी कमाल दिसते. माझे चित्रपटही चांगले चालतात. मी जशी आहे तसं लोकांनी मला पहावं, आणि माझं कौतुक करावं, असं मला वाटतं.

 

सेल्फ केअर म्हणजे काय, तर  स्वत:साठी वेळ काढणं , मित्रांसोबत चांगाल वेळ घालवणं, सैफसोबत निवांत वेळ घालवणं, स्वयंपाक करणं, जे आवडेलं ते करणं’, असं करीनाने सांगितलं. ‘ तुम्हाला काय करुन छान वाटेल हे महत्वाचं आहे. चांगलं अन्न, एखाद्यासोबत मनसोक्त गप्पा आणि वाईनची एक बॉटल हे माझ्यासाठी पुरेसं असतं’, असंही ती म्हणाली.

करीनाच्या या वक्तव्याचं सध्या खूप कौतुक होतंय. आपलं वाढतं वय, आहे तसं स्वीकारा हा मोलाचा सल्ला तिने सर्वांना दिला आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;