मुसळधार पावसामुळं राजगड किल्ल्याची 400 वर्ष जुनी भिंत कोसळली, 2 लहान मुलांसह 7 जणांचा मृत्यू

मुसळधार पावसामुळं राजगड किल्ल्याची 400 वर्ष जुनी भिंत कोसळली, 2 लहान मुलांसह 7 जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशमधील दतिया जिल्ह्यामध्ये पावसाचा अक्षरश: कहर सुरू आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच राजगड किल्ल्याची भिंत कोसळल्याचे समोर आले आहे. सकाळी साडे तीनच्या सुमारास ही घटना घडली असून भिंत कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोघे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दतिया जिल्ह्यातील खलकापुरा भागामध्ये राजगड किल्ला असून किल्ल्याच्या जवळच घरं आहेत. मुसळधार पावसामुळे जर्जर झालेली भिंत पहाटेच्या सुमारास घरावर कोसळली. यावेळी घरातील सदस्य गाड झोपेमध्ये होते. ते सर्वच भिंतीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ढिगारा हटवून दोघांना बाहेर काढले. मात्र इतरांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यास उशिर झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह जिल्हाधिकारी, पोलीस आणि आपत्ती निवारण पथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. ढिगारा हटवण्यात आला असून जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय.

4 लाखांची मदत जाहीर

जिल्हाधिकाऱ्यांनी सदर घटनेची माहिती राज्य सरकारला दिली आहे. यानंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेमध्ये प्राण गमावलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;