अनुष्का शर्माची बहीण रुहानी शर्मा आहे तरी कोण? इंटिमेट व्हिडीओमुळे सर्वत्र खळबळ

अनुष्का शर्माची बहीण रुहानी शर्मा आहे तरी कोण? इंटिमेट व्हिडीओमुळे सर्वत्र खळबळ

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या एका रात्रीत स्टार झाल्या आणि यशाच्या उच्च शिखरावर पोहोचल्या. या यादीमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचं देखील नाव आहे. ‘रब ने बना दी जोडी’ सिनेमात अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत स्क्रिन शेअर केल्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. अनेक सिनेमांमध्ये अनुष्काने मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता अभिनेत्री तिच्या संसारात व्यस्त झाली आहे. पण आता अनुष्का स्वतःच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, चुलत बहिणीमुळे चर्चेत आली आहे. अनुष्काची बहीण रुहानी शर्मा हिने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

रूहानी शर्मा हिने ‘आगरा’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. सिनेमा ऑनलाईन लीक झाला असून अभिनेत्री काही इंटिमेट सीन देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रुहानी शर्मा हिची चर्चा रंगली आहे. शिवाय तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रुहानी शर्मा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीचा जन्म हिमाचल प्रदेशातील सोलन येथे झाला. पंजाब विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर रुहानी हिने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. रुहानी हिने अनेक पंजाबी म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केलं आहे. त्यानंतर अभिनेत्रीने तामिळ सिनेमांमधून अभिनयाच्या दुनियेत पदार्पण केलं. तमिळनंतर रुहानी हिने तेलुगूमध्येही पदार्पण केलं. दोन्ही इंडस्ट्रीत रुहानी हिच्या अभिनयाचे खूप कौतुक झालं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ruhani Sharma (@ruhanisharma94)

तामिळ, तेलगू सिनेमात यश मिळवल्यानंतर अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं आहे. ‘आगरा’ सिनेमातून रुहानी हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. सिनेमात रुहानी हिच्यासोबत मोहित अग्रवाल, प्रियंका बोस, विभा चिब्बर आणि सोनल झा यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 2023 च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर झाला.

‘आगरा’ सिनेमा ऑनलाइन लीक झाल्यानंतर, सोशल मीडियावर अनेक इंटिमेट सीन व्हायरल होत आहेत. त्यामुळे रुहानी हिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. ट्रोलिंगनंतर रुहानीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.

रुहानीच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘ब्लॉकआउट ‘ सिनेमात देखील अभिनेत्री मुख्य भूमिकेत होती. सिनेमात अभिनेत्रीसोबत विक्रांत मैसी, सुनील ग्रोवर, मौनी रॉय मुख्य भूमिकेत होते. रुहानी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;