म्हणे गतिमान सरकार… ठाण्यातील विद्यार्थ्यांचे गणवेश टेंडरमध्ये अडकले; 36 हजार मुले जुने कपडे घालून पालिका शाळेत

म्हणे गतिमान सरकार… ठाण्यातील विद्यार्थ्यांचे गणवेश टेंडरमध्ये अडकले; 36 हजार मुले जुने कपडे घालून पालिका शाळेत

शाळेची पहिली घंटा वाजताच पहिल्याच दिवशी पालिका तसेच जिल्हा परिषदेतील शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची राणा भीमदेवी थाटात सरकारने घोषणा केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांचे खासगी निवासस्थान असलेल्या ठाण्यातील पालिका शाळांमधील तब्बल हजारो विद्यार्थ्यांना तीन महिन्यांनंतरही गणवेश मिळालेला नाही. गणवेशाची प्रक्रिया टेंडरमध्ये अडकल्याने मुलांना जुनेच फाटलेले कपडे घालून शाळा गाठण्याची वेळ आली आहे. त्यामुळे गतिमान सरकारच्या गप्पा मारणारे मिंधे सरकार गणेशोत्सव संपत आला, आता दिवाळी उजाडल्यावर तरी मुलांना गणवेश देईल का, असा सवाल ठाणेकर पालकांनी विचारला आहे.

ठाणे महापालिकेच्या शाळेत सुमारे 36 हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण विभागाने गणवेश घेण्यासंदर्भातील निविदा जुलै महिन्यात काढली होती. मात्र लोकसभा आणि कोकण पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही निविदा प्रक्रिया काही प्रमाणात रखडली. परिणामी विद्यार्थ्यांच्या हाती अद्यापपर्यंत गणवेश पडले नाहीत. दरम्यान, मे महिन्यामध्ये प्रतिनियुक्तीवर आलेले उपायुक्त सचिन पवार यांनी शिक्षण विभागाची धुरा सांभाळल्यानंतर तातडीने यासंदर्भात पाठपुरावा करून लवकरात लवकर निविदा प्रक्रिया संपवून विद्यार्थ्यांना नवीन गणवेश कसे देता येतील यासाठी प्रयत्न केले. अखेर आता निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या 15 दिवसांत विद्यार्थ्यांच्या हातात नवीन गणवेश मिळण्याची शक्यता शिक्षण विभागाचा वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

पहिल्याच दिवशी नवीन पुस्तके

शाळा 16 जूनपासून सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू होत असतानाच विद्याथ्यर्थ्यांना पहिल्याच दिवशी नवीन पुस्तके मिळाली आहेत. तसेच डीबीटी पद्धतीप्रमाणे विद्यार्थ्यांनी वह्या, कंपास, इतर साहित्य खरेदी करण्यात आले. ठाणे महापालिकेच्या प्राथमिक 111 आणि माध्यमिक 23 अशा मिळून 134 शाळा असून सद्यस्थितीत 36 हजारांच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

म्हणूनच उशीर झाला

विद्यार्थ्यांना यापूर्वी डीबीटी पद्धतीनुसार गणवेश उपलब्ध होत होते. विद्यार्थ्यांनी गणवेश घ्यायचा आणि त्याचे बिल शाळेला सादर करायचे, त्यानंतर पैसे पालकांच्या खात्यात जमा होत होते, परंतु मागील वर्षांपासून पुन्हा ती पद्धत बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या हाती उशिराने गणवेश पडत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;