स्वामी रामगिरी महाराजांचे आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावरून काढून टाका, पोलिसांना दिले आदेश

स्वामी रामगिरी महाराजांचे आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावरून काढून टाका, पोलिसांना दिले आदेश

स्वामी रामगिरी महाराजांचे आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावरून काढून टाका, असे आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले. मोहम्मद पैगंबरांबाबत चुकीचे विधान केल्याचा आरोप स्वामी रामगिरी महाराजांवर आहे.

अमीन इद्रिसी यांनी ही याचिका केली आहे. स्वामी रामगिरी महाराज यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याने मोहम्मद पैगंबर व मुस्लिम समाजाची बदनामी होत आहे. मुंबई पोलीस आयुक्त व कांदिवली पोलिसांकडे याची तक्रार करण्यात आली. पोलीस काहीच कारवाई करत नाहीत. न्यायालयानेच या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे व सोशल मीडियावरून हे व्हिडीओ काढून टाकण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. स्वामी रामगिरी महाराज यांच्या आक्षेपार्ह विधानामुळे दोन समाजांत तेढ निर्माण होत आहे. त्याने गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, असे याचिकाकर्त्यांचे वकील एजाज नख्वी यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणले. त्याची दखल घेत न्यायालयाने वरील आदेश दिले. यावरील पुढील सुनावणी दोन आठवडय़ांनी होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;