खोके सरकारचा ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट; भाईंदरमधील मेळाव्यात लक्ष्मण हाके यांचा घणाघात

खोके सरकारचा ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट; भाईंदरमधील मेळाव्यात लक्ष्मण हाके यांचा घणाघात

खोके सरकारने ओबीसी आरक्षण संपवून टाकण्याचा घाट घातला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडून ओबीसींचे आरक्षण रद्द करण्यासाठी कुटील डाव खेळला जात आहे, असा घणाघात ओबीसींचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी येथे केला आहे. ओबीसी समाज आरक्षण बचाव संवाद यात्रेच्या निमित्ताने ते शहरात आले होते. यावेळी त्यांनी खोके सरकारवर कडाडून टीका केली.

खोके सरकारने फक्त ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा घाट घातला नाही तर महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींमधील आरक्षण चुकीच्या पद्धतीने कमी करून ओबीसींचे प्रतिनिधित्व कमी करण्याचाही प्रयत्न सुरू केला आहे. यावर सत्तेतील कोणताही घटक काहीच बोलायला तयार नाही. ओबीसी आरक्षणाच्या बाजूने महाराष्ट्रातील कोणताच आमदार साधे पत्र द्यायलाही तयार नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर निवडणुकीत ओबीसी समाज चांगलाच धडा शिकवेल, असा इशाराही लक्ष्मण हाके यांनी यावेळी दिला.

याप्रसंगी सचिन डोईफोडे, सुधीर कांबळी, साईनाथ वाघ, डॉ. सुरेश येवले, साईनाथ बंडगर, राज बंडगर, शरद सुसलादे आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;