अजितदादा, तुमचे विचारही पिंक झाले का? अनाहुत पत्रात कार्यकर्त्याची खंत

अजितदादा, तुमचे विचारही पिंक झाले का? अनाहुत पत्रात कार्यकर्त्याची खंत

अजितदादा माझ्यासारख्या कार्यकर्त्यासह जिवाभावाच्या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविषयी शंका घेणारे, त्यांच्या निष्ठेवर संशय घेणारे आणि त्यांना आरोपीच्या केंद्रात उभे करणारे तुम्ही कधीच नव्हता. यापूर्वी आम्ही तुमच्याकडून असे कधी अनुभवलेसुद्धा नाही. परंतु, दादा सध्या तुम्ही पिंक झाला आहात आणि तुमचे विचारही पिंक झाले आहेत की काय, अशी शंका मला येत आहे अशी विचारणा एका कार्यकर्त्याने अनाहुत पत्राद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे.

बारामतीमध्ये अजित पवार यांना एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पाठवलेले अनावृत्त पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या पत्रामध्ये अजित पवार यांना अनेक प्रश्न करण्यात आले आहेत.

दादा तुमच्या भाषणातला रांगडेपणा संपला आहे. सध्या तुम्ही फार चिडचिड करता. वहिनींच्या पराभवानंतर तुमचं संशयाने पाहणे आता सहन होत नाही. दादा तुम्ही माफी मागून मोकळे झालात, त्याच्या सर्वत्र बातम्या झाल्या. पण या सगळ्या घडामोडीमध्ये आम्ही मात्र पवार साहेबांच्या लेखी वाईट ठरलो. आम्ही कुणाची माफी मागायची हे सांगा, असेही कार्यकर्त्याने पत्रात म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;