महिलेच्या विनयभंगप्रकरणी एकाला अटक

महिलेच्या विनयभंगप्रकरणी एकाला अटक

रस्त्याने जात असलेल्या महिलेला पाहून अश्लील कृत्य करून विनयभंग करणाऱ्याला सांताक्रुझ पोलिसांनी अटक केली. संतोष अहिरे असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. तक्रारदार महिला या विलेपार्ले येथे राहतात.

मंगळवारी रात्री त्या विलेपार्ले स्थानक येथून लाला लजपतराय रोडच्या दिशेने जात होत्या तेव्हा रस्त्यावर उभ्या असलेल्या एकाने महिलेला पाहून अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. महिलेने फोन करून याची माहिती सांताक्रुझ पोलिसांना दिली.

त्या माहितीनंतर काहीच वेळात सांताक्रुझ पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी अहिरेला ताब्यात घेतले. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अहिरेविरोधात गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अहिरेला अटक करून आज न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;