Chandrapur News – NEET च्या विद्यार्थिनीची वसतिगृहातच आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

Chandrapur News – NEET च्या विद्यार्थिनीची वसतिगृहातच आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

NEET परीक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चंद्रपूरमध्ये उघडकीस आली आहे. प्रांजली राजूरकर असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. नीट क्लासेसच्या वसतिगृहातच प्रांजलीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

प्रांजली ही यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील रहिवासी आहे. बारावीनंतर तिने चंद्रपूर शहरातील इन्स्पायर कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतला. प्रांजली NEET परीक्षेची तयारी करत होती. संस्थेच्या मालकीच्या वसतिगृहातच ती राहत होती. बुधवारी सायंकाळच्या सुमारास खोलीत एकटी असतानाच तिने गळफास घेत आत्महत्या केली.

आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आले नाही. मात्र अभ्यासाच्या तणावातून विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलीस प्रकरणाचा तपास करीत आहेत. तपासाअंती सत्य समोर येईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;