Raid 2 ची घोषणा, अजय देवगणच्या विरुद्ध हा मराठी सुपरस्टार दिसणार व्हिलनच्या भूमिकेत

Raid 2 ची घोषणा, अजय देवगणच्या विरुद्ध हा मराठी सुपरस्टार दिसणार व्हिलनच्या भूमिकेत

बॉलीवूडचा ॲक्शन हिरो अजय देवगण पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कॉमेडी सिनेमा असो की, थरार अजय देवगणने त्याची एक वेगळी छाप सोडली आहे. त्याचा एक प्रेक्षकवर्ग त्याने निर्माण केला आहे. अजय देवगणने ॲक्शन चित्रपटांद्वारे वेगळी ओळख तर निर्माण केलीच आहे पण ‘शैतान’ आणि ‘मैदान’नंतर आता तो ‘रेड 2’ चित्रपटात दिसणार आहे. रेड या चित्रपटात अजय देवगणने आपल्या भूमिकेने सगळ्यांचीच मने जिंकली होती. सिनेमाच्या यशानंतर आता रेड २ ची घोषणा करण्यात आली आहे.

2018 मध्ये राज कुमार गुप्ता दिग्दर्शित ‘रेड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आलीये. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ‘रेड 2’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणि सिनेमातील कलाकारांचा खुलासा केलाय. यासोबतच चित्रपटाची कथानक आणि शूटिंग लोकेशन्सही समोर आले आहेत.

‘रेड 2’ ची घोषणा केली

‘रेड’ हा अजय देवगणच्या टॉप क्लास चित्रपटांपैकी एक आहे. त्यानंतर बुधवारी चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात अजय देवगण आयआरएस अधिकारी अमेय पटनायकच्या भूमिकेत दिसणार असून, भ्रष्टाचाऱ्यांचा पर्दाफाश करून त्यांना धडा शिकवणार आहे.

रितेश देशमुख नकारात्मक भूमिकेत दिसणार

राज कुमार गुप्ता ‘रेड 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही करणार आहेत. या चित्रपटात रितेश देशमुख अशा व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. जो अजय देवगणला त्रास देणार आहे. ज्याच्या काळ्या धंद्याचा खुलासा झाल्याने संपूर्ण यंत्रणा हादरली आहे. ‘रेड’ प्रमाणेच ‘रेड 2’ हा देखील आयकर विभागाच्या छाप्यांवर आधारित चित्रपट आहे. अजय आणि रितेश व्यतिरिक्त या चित्रपटात वाणी कपूर आणि रजत कपूर देखील दिसणार आहे.

चित्रपटाची रिलीज डेट लॉक

‘रेड 2’ हा चित्रपट 21 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या मुख्य कथानकाचे चित्रीकरण लखनौ आणि दिल्लीत होणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;