पत्नी गरोदर होती आणि अभिनेत्याचं या अभिनेत्रीसोबत सुरु होते अफेअर

पत्नी गरोदर होती आणि अभिनेत्याचं या अभिनेत्रीसोबत सुरु होते अफेअर

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांमध्ये अफेअरच्या चर्चा होत्या. काहींना पुढे संसार केला, काहीचं ब्रेकअप झालं तर काहींचा संसार मध्येच मोडला. विवाह झाल्यानंतर ही अनेक सेलिब्रेटी त्यांच्या अफेअरमुळे चर्चेत राहिले. असंच एक नाव आहे संजय खान यांचे. ज्यांचं अफेअर झीनत अमानसोबत होते. ज्यामुळे पुढे खूपच चर्चा रंगली. त्यांच्यातील वाद वणव्यासारखा सर्वत्र पसरला. झीनत अमान आणि संजय खान यांनी ‘धुंध’ आणि ‘अब्दुल्ला’सह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. या दरम्यान त्यांच्यात अफेअर सुरु झाले. त्याच्या बातम्या पसरू लागल्या. एखाद्या अभिनेत्याचा पत्नीने कधीच असं उघड पणे म्हटले नव्हते. परंतु संजयची पत्नी जरीन खानने त्यांचे नाते धोक्यात असल्याचे कबूल केले होते.

जरीन यांनी सिमी गरेवालच्या शोमध्ये सांगितले की, काही लोकांना असे वाटत होते की तिचे लग्न धोक्यात आले आहे. “एक वेळ अशी होती जेव्हा काही लोकांना वाटत होते की माझे लग्न धोक्यात आले आहे, परंतु मला असे अजिबात वाटत नव्हते.” यावर संजयने असेही सांगितले की, त्याच्या लग्नाला कधीही धोका नव्हता.

संजय खान म्हणाले की, “मी माझ्या पत्नी आणि मुलांवर खूप प्रेम करत होतो, आणि जर कोणी ते हलक्यात घेत असेल तर ती वेगळी गोष्ट होती, कारण माझ्या बाजूने असे काहीही नव्हते.” इंडियन एक्स्प्रेसवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, जरीन खान गर्भवती होती आणि त्यावेळी संजय खानचे अभिनेत्रीसोबत अफेअर होते. त्यावेळी त्याचं नाव झीनत अमान सोबत जोडलं जात होतं.

पतीच्या अफेअरवर काय म्हणाली जरीन खान?

याबद्दल जरीन म्हणाली होती, “मी माझ्या पतीला ओळखते, तो कदाचित वाहून जाईल पण एकच गोष्ट अशी आहे की एक अभिनेत्याची पत्नी असल्याने माझ्यासाठी संयम, ताकद आणि विश्वास असणे महत्त्वाचे होते की तो परत येईल. मी असे म्हणू शकते की ती पहिली स्त्री नव्हती जी त्याच्या प्रेमात पडली, तेथे अनेक स्त्रिया होत्या, परंतु तो नेहमीच माझा होता.

संजय खान आणि जरीन खान यांनी 1966 मध्ये लग्न केले. दोघांच्या वयात ५ वर्षांचा फरक होता. त्यावेळी जरीन 20 वर्षांची आणि संजय खान 25 वर्षांचे होते. त्यांना आता फराह खान अली, सिमोन अरोरा, सुझैन खान आणि झायेद खान ही चार मुले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;