गिरगावात संतापजनक घटना उघडकीस, जन्मदात्याकडूनच पोटच्या मुलींवर लैंगिक अत्याचार

गिरगावात संतापजनक घटना उघडकीस, जन्मदात्याकडूनच पोटच्या मुलींवर लैंगिक अत्याचार

मुंबईतील गिरगावात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या बापानेच पोटच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. बापाच्या लैंगिक छळाला कंटाळून मोठी मुलगी अनाथालयात गेली. तर लहान मुलीनेही आईसोबत घर सोडले आहे. घटना उघड होताच सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. व्हीपी रोड पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी पत्नी आणि दोन मुलींसह गिरगावात राहत होता. काही महिन्यांपूर्वी 18 वर्षीय मोठ्या मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. याबाबत बालकल्याण समितीकडेही तक्रार करण्यात आली होती. यानंतर मोठ्या मुलीला अनाथालयात पाठवण्यात आले.

मोठी मुलगी अनाथालयात गेल्यानंतर वडिलांनी लहान मुलीवर अत्याचार करण्यास सुरवात केली. एक दिवस मुलींची आई मोठ्या मुलीला भेटायला अनाथालयात गेली आणि तिने वडील लहान मुलीवर अत्याचार करत असल्याचे तिला सांगितले. यानंतर मोठ्या मुलीने आपल्यासोबतही वडिलांनी अत्याचार केल्याचे सांगितले. हे ऐकताच आईला मोठा धक्का बसला.

मोठी मुलगी पाच वर्षांची असल्यापासून वडील तिचा लैंगिक छळ करत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली. याबाबत कुठेही वाच्छता केल्यास जीवे मारण्याची धमकी मुलीला देण्यात आली होती. याप्रकरणी मोठ्या मुलीने बालकल्याण समितीकडे तक्रार दिली. बालकल्याण समितीने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र हे प्रकरण गिरगावातील असल्याने व्हीपी रोड पोलिसात हे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे. पोलिासांनी आरोपी बापाला अटक केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;