सकाळी 9 वाजता नेमके काय घडले, मलायका अरोरा हिच्या आईकडून अत्यंत मोठा खुलासा, म्हणाली, त्यांना…

सकाळी 9 वाजता नेमके काय घडले, मलायका अरोरा हिच्या आईकडून अत्यंत मोठा खुलासा, म्हणाली, त्यांना…

मलायका अरोरा हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मलायका अरोरा हिच्या वडिलांनी सहाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ज्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळाले. मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर अनेक कलाकार अभिनेत्रीच्या घरी पोहोचले. ज्यावेळी मलायकाच्या वडिलांनी आत्महत्या केली, त्यावेळी फक्त तिची आईच घरात होती. मलायका आणि तिची बहीण कालच तिच्या आई वडिलांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. मलायकाच्या आई वडिलांचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. आता ते दोघाे बांद्रामध्ये घर घेऊन एकत्र राहत होते.

मलायका अरोरा ही आपल्या वडिलांसोबत खास फोटो शेअर करताना अनेकदा दिसलीये. मलायका अरोरा हिच्या आईने आता मोठा खुलासा केलाय. सकाळी नऊ वाजता नेमके काय घडले याबद्दल खुलासा करताना मलायका अरोरा हिची आई दिसली आहे. यासोबतच काही महत्वाच्या गोष्टी देखील मलायकाच्या आईकडून सांगण्यात आल्या आहेत.

मलायका अरोरा हिची आई जॉयस पॉलीकार्प हिने सांगितले की, मलायकाच्या वडिलांना दररोज सकाळी बाल्कनीत बसून पेपर वाचण्याची सवय होती. ज्यावेळी जॉयस पॉलीकार्प यांना बेडरूममध्ये अनिल अरोरा यांची चप्पल दिसली नाही, त्यावेळी त्यांनी अनिल अरोरा यांना घरात शोधण्यास सुरूवात केली. यावेळी त्या बाल्कनीत देखील बघायला गेल्या.

जेंव्हा बाल्कनीतून जॉयस पॉलीकार्प यांनी खाली वाकून बघितले तर लोक ओरडत होते. पुढे जॉयस पॉलीकार्प या म्हणाल्या की, अनिल अरोरा यांना कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता किंवा ते आजारी देखील नव्हते. फक्त थोडासा त्यांच्या गुडघ्यामध्ये त्रास होता, तो देखील फार काही नव्हता. सकाळी नऊ वाजता नेमके काय घडले, याबद्दल त्यांनी खुलासा केला.

मलायका अरोरा ही अकरा वर्षांची असतानाच मलायका हिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला. मलायका आणि तिच्या बहिणीचा सांभाळ तिच्या आईनेच केलाय. मात्र, काही वर्षांपासून परत तिचे आई वडिल एकत्र राहत होते. मलायका अरोरा हिच्या वडिलांच्या आत्महत्येबद्दल कळताच अरबाज खान, अर्जून कपूर हे त्यांच्या घरी धावून आल्याचे बघायला मिळाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;