शिक्षकाने काढली दोन अल्पवयीन मुलींची छेड, मुलांनाही दिला शारिरीक त्रास

शिक्षकाने काढली दोन अल्पवयीन मुलींची छेड, मुलांनाही दिला शारिरीक त्रास

एका शिक्षकाने गुरू शिष्याच्या नात्याला काळीमा फासली आहे. दोन अल्पवयीन विद्यार्थिनींची छेड काढली असून काही विद्यार्थ्यांना शारिरीक त्रास दिला आहे. नागपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी आरोपी शिक्षकाला
अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एका शाळेच्या मुख्याध्यापिकाकडे दोन विद्यार्थिनींनी तक्रार केली. शिक्षकाने आपल्यासोबत अश्लील चाळे केले आणि आपली छेड काढल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच वर्गातल्या नऊ विद्यार्थ्यांनी या शिक्षकाने आपल्याला शारिरीक त्रास दिल्याचे सांगितले. या प्रकरणी मुख्यध्यापिकाने समिती नेमून चौकशी केली तर त्यात हा शिक्षक दोषी आढळला. शाळेच्या मुख्यध्यापकांनी पोलिसात या शिक्षकाविरोधात तक्रार केली. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;