गोरेगावमध्ये बेस्ट बसची दुचाकीला धडक, अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
गोरेगावमध्ये बेस्टने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गोरेगावमधील आरे कॉलनी परिसरात मंगळवारी ही घटना घडली. साकीब खान असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
मयत सादिक का दिंडोशी येथील रहिवासी असून तो ब्रेड डिलिव्हरीचे काम करतो. मंगळवारी नेहमीप्रमाणे ब्रेड डिलिव्हरीसाठी जात असताना बेस्ट बसने सादिकच्या दुचाकीला धडक दिली. ही बस गोरेगाव स्थानकातून मयूर नगरकडे चालली होती.
बसने धडक दिल्यानंतर सादिक दुचाकीवरून खाली पडला आणि बसच्या चाकाखाली चिरडला गेला. रस्त्यावरून जात असलेल्या नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी रॅश ड्रायव्हिंग आणि निष्काळजीपणा केल्याप्रकरणी बस चालकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रमेश लोंढे असे आरोपी बस चालकाचे नाव आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List