महाराष्ट्रात गुंडाराज! मिंधे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या बॉडीगार्डची भररस्त्यात दादागिरी, एका व्यक्तीला बेदम मारले

महाराष्ट्रात गुंडाराज! मिंधे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या बॉडीगार्डची भररस्त्यात दादागिरी, एका व्यक्तीला बेदम मारले

मिंधे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या बॉडीगार्डकडून नेरळ येथे एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत थोरवे यांचा बॉडिगार्ड असलेला शिवा नावाचा व्यक्ती एका कारमधील व्यक्तीला हातातील दांड्याने मारहाण करताना दिसत आहे. त्या गाडीत त्या व्यक्तीची बायको व मुलं देखील होती व त्यांचे रडण्याचे किंचाळण्याचे आवाज देखील ऐकू येत आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिड़ीओसोबत त्यांनी एक पोस्ट शेअर करत राज्य सरकारला फटकारले आहे. ”महाराष्ट्रात गुंडाराज! मिंधेंच्या आमदाराच्या, महेंद्र थोरवे यांच्या ‘शिवा’ नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे भर दिवसा, भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली. त्या व्यक्तीची बायका मुलं रडत होती, पण कोणी मदतीला यायची हिंमत केली नाही. कायद्याच्या चिंधड्या, लोकांचे हाल! ही फक्त कर्जतची अवस्था नाही, राज्यभरात गुंडगिरी वाढलीय. कायदा-सुव्यवस्थेची वाट लागलीये! कारण, गुंडांचा म्होरक्याच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रीपदावर बसलाय”, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;