खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रक कालव्यात पडला, 7 जणांचा जागीच मृत्यू

खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रक कालव्यात पडला, 7 जणांचा जागीच मृत्यू

रस्त्यावरील खड्डा चुकवण्याचा प्रयत्न करत असतानाच नियंत्रण सुटल्याने आयशर ट्रक कालव्यात पडला. या घटनेत सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात देवरापल्ली गावाजवळ मंगळवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली.

आयशर ट्रक जांगरेड्डीगुडेम येथून काजू आणि आठ प्रवासी घेऊन जात होता. देवरापल्ली गावाजवळ रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे ट्रक कालव्यात पडला.

या अपघातात ट्रकवर बसलेल्या सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. एका प्रवाशाला वाचवण्यास यश आले असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी कोव्हुरु सरकारी रुग्णालयात नेण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक जी देवा कुमार यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;