Pune News – किरकोळ वादातून लिव्ह पार्टनरची हत्या, मृतदेह रिक्षात ठेवून आईच्या घराबाहेर पार्क

Pune News – किरकोळ वादातून लिव्ह पार्टनरची हत्या, मृतदेह रिक्षात ठेवून आईच्या घराबाहेर पार्क

पिंपरीत धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. किरकोळ वादातून लिव्ह इन पार्टनरचे महिलेची गळा आवळून हत्या केली. हत्या केल्यानंतर महिलेचा मृतदेह रिक्षात ठेवला आणि रिक्षा तिच्या आईच्या घराबाहेर पार्क केली. घटना उघड होताच परिसरात एकच खळबळ उडाली. शिवानी सुपेकर असे मयत महिलेचे नाव आहे. तर अनिल आवाळे असे आरोपीचे नाव आहे.

शिवानीच्या पतीचे काही वर्षापूर्वी निधन झाले आहे. तिला पहिल्या पतीपासून एक मुलगाही आहे. पतीच्या निधनानंतर शिवानी गेल्या दोन वर्षापासून अनिल आवाळे याच्यासोबत काळेवाडी परिसरात लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती.

मंगळवारी रात्री शिवानी आणि अनिलमध्ये किरकोळ कारणातून वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि अनिलने शिवानीची गळा आवळून हत्या केली. हत्या केल्यानंतर शिवानीचा मृतदेह रिक्षात ठेवला आणि ती रिक्षा शिवानीच्या घराबाहेर पार्क केली. यानंतर आरोपी पळून गेला.

याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. दिवसेंदिवस वाढती गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;