13 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याशी ब्रेकअपनंतर अनन्या पांडे करतेय याला डेट; अंबानींशी आहे खास कनेक्शन

13 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याशी ब्रेकअपनंतर अनन्या पांडे करतेय याला डेट; अंबानींशी आहे खास कनेक्शन

अभिनेत्री अनन्या पांडे ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत चर्चेत असलेल्या स्टारकिड्सपैकी एक आहे. अनन्या तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत असते. तिच्यापेक्षा वयाने 13 वर्षे मोठ्या असलेल्या आदित्य रॉय कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे अनन्या प्रकाशझोतात होती. या दोघांना परदेशात एकत्र फिरतानाही पाहिलं गेलं होतं. तर विविध कार्यक्रमांमध्येही दोघं अनेकदा एकत्र दिसले. मात्र गेल्या काही दिवसांपासून अनन्या आणि आदित्य यांच्या ब्रेकअपच्या चर्चा आहेत. ब्रेकअपनंतर अनन्याचं नाव आता एका प्रसिद्ध अमेरिकन मॉडेलशी जोडलं जातंय. विशेष म्हणजे या मॉडेलचं देशातील सर्वांत श्रीमंत कुटुंब म्हणजेच अंबानींशी खास कनेक्शन आहे.

अनन्या ही अमेरिकन मॉडेल वॉकर ब्लँकोला डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे. या चर्चेला आता तिच्याच एका फोटोमुळे आणखी हवा मिळाली आहे. अनन्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून या फोटोमधील तिच्या गळ्यातील पेंडंटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. बुधवारी एका रेडिट युजरने अनन्या पांडेचा पाठमोरा फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये तिच्या गळ्यात ‘W’ या अक्षराचं पेंडंट पहायला मिळतंय. त्यामुळे वॉकरसोबत अनन्याच्या नात्याची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Walker (@walker_blanco)

नुकतंच वॉकरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अनन्याच्या ‘कॉल मी बे’ या वेब सीरिजविषयीची पोस्ट लिहिली होती. यात त्याने अनन्याचं कौतुक केलं होतं. वॉकर हा अनंत अंबानींच्या ‘वंतारा ॲनिमल पार्क’साठी काम करतो. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिल्यान्स फाऊंडेशनकडून हे पार्क उभारण्यात आलं आहे. अनंत अंबानींच्या लग्नाच्या वेळी या पार्कचं जोरदार प्रमोशन करण्यात आलं होतं. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या आधी आयोजित केलेल्या क्रूज पार्टीदरम्यान अनन्या आणि वॉकरची एकमेकांशी भेट झाली होती.

अनन्या आणि आदित्यने कधीच जाहीरपणे त्यांच्या नात्याची कबुली दिली नव्हती. मात्र या दोघांना व्हेकेशन, पार्ट्या आणि विविध कार्यक्रमांमध्ये अनेकदा एकत्र पाहिलं गेलं होतं. मात्र अनंत अंबानीच्या लग्नाच्या काही दिवस आधीच या दोघांचं ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जातंय. अंबानींच्या लग्नातही दोघं एकत्र दिसले नव्हते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;