अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत संपवलं जीवन

अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत संपवलं जीवन

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल अरोरा यांनी आत्महत्या केली आहे. मुंबईतील वांद्रे येथील इमारतीच्या छतावरून उडी घेत त्यांनी जीवनयात्रा संपवली. ही घटना बुधवारी सकाळी 9 च्या सुमारास घडली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी बाबा हॉस्पिटलमध्ये पाठवला.

अनिल अरोरा हे मर्चंट नेव्हीमध्ये काम करत होते. निवृत्तीनंतर ते मुंबईतील वांद्रे येथे आशा मैनार नावाच्या इमारतीमध्ये रहात होते. बुधवारी सकाळी 9 च्या सुमारास त्यांनी इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे धाव घेतली. पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. दरम्यान, वडिलांनी टोकाचे पाऊल उचल्याची माहिती मिळाली तेव्हा मलायका पुण्यामध्ये होती. माहिती मिळताच ती तत्काळ मुंबईकडे रवाना झाली आहे. तसेच तिचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान यानेही अरोरा कुटुंबाकडे धाव घेतली आहे.

अनिल अरोरा हे गेल्या काही काळापासून आजारी होते. गेल्या वर्षी वैद्यकीय कारणांमुळे त्यांना उपचारांसाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी आई जॉइससह मलायकाही रुग्णालयात दिसली होती. त्यांना नक्की काय आजार झाला होता ते समोर आले नव्हते.

अनिल अरोरा यांचाजॉइस पॉलीकॉर्प यांच्याशी विवाह झाला होता. या दाम्पत्याला मलायका आणि अमृता नावाच्या दोन मुली आहेत. मयालका 11 वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;