Ganeshotsav 2024 – 100 वर्षांची परंपरा जपणारा गिरगावचा गणपती

Ganeshotsav 2024 – 100 वर्षांची परंपरा जपणारा गिरगावचा गणपती

गिरगावच्या मुगभाट परिसरातील माधवदास प्रेमजी चाळ म्हणजे आताची माधवदास प्रेमजी गृहनिर्माण संस्थेच्या श्रीगणरायाचे यंदा शताब्दी वर्ष आहे. 1924 साली माधवदास प्रेमजी चाळ गणेशोत्सवाचा शुभारंभ झाला. गणेशोत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची परंपरा आजही कायम आहे.

यंदा दहा दिवसांच्या उत्सवात ‘डबेवाल्यांचे व्यवस्थापन’ या विषयावर सुभाष तळेकर माहिती देतील. तसेच 70-90 च्या दशकातील गाण्यांचा कार्यक्रम, मराठी कलाकारांची स्टॅण्डअप कॉमेडी, महिलांच्या आयुष्यावर ‘ती’ची कहाणी आदी कार्यक्रम सादर होतील. तसेच शनिवारी गणेशयाग, रविवारी सहस्रावर्तन होईल. अनंत चतुर्दशीच्या पहाटे काकड आरती होईल. माधवदास प्रेमजी चाळीच्या गणेशोत्सवाचे वैशिष्टय़ म्हणजे मागील 100 वर्षे एकाच कारखान्यातून मूर्ती घडवली जाते, अशी माहिती चाळीतील जुने रहिवासी माधव दामले यांनी दिली.

माधवदास प्रेमजी चाळीतील गणेशोत्सवाचे 1975 साली सुवर्ण महोत्सव तर 1984 साली हिरक महोत्सवी वर्ष होते.  1999 साली अमृत महोत्सव साजरा झाला. यानिमित्त अनेक दिग्गजांचे कार्यक्रम सादर झाले होते. सुलोचना चव्हाण, पं. शंकर अभ्यंकर, पंडित सुरेश तळवलकर, यशवंत देव, पंडित जितेंद्र अभिषेकी, व. पु., प्रभाकर पणशीकर, श्रीधर फडके, सुरेश खरे, भक्ती बर्वे आदी दिग्गजांचे पाय या वास्तूला लागले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;