याला सिंघम समजत होते पण हा तर…; निक्की संग्रामबद्दल काय म्हणाली?

याला सिंघम समजत होते पण हा तर…; निक्की संग्रामबद्दल काय म्हणाली?

‘बिग बॉस मराठी’ चा यंदाचा सिझन चांगलाच गाजतो आहे. बॉडी बिल्डर संग्राम चौगुले याने नुकतंच ‘बिग बॉस मराठी’ च्या घरात एन्ट्री केली आहे. त्यानंतर निक्की आणि संग्रामध्ये पहिल्याच दिवशी वाद झाल्याचं पाहायला मिळालं. ‘बिग बॉस मराठी’ च्या घरात प्रत्येक सदस्य सध्या प्लॅनिंग करण्यामागे लागला असून प्रत्येक सदस्याच्या डोक्यात नवा गेम शिजत आहे. याचं कारण म्हणजे बिग बॉसच्या घरात एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. संग्राम चौगुले हा बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमधला पहिला वाइल्ड कार्ड सदस्य आहे. बिग बॉसच्या घरात संग्रामाची जबरदस्त पर्सनॅलिटी पाहून अनेक जण त्याच्यावर इंप्रेस झाले आहेत.

संग्रामने सूरजला दिला फिटनेस मंत्री

आजच्या अनसीन अनदेखामध्ये, संग्राम सूरजला पुशअप्स कसे मारायचे हे दाखवत असून आर्या त्याने मारलेले पुशअप्स मोजत आहे. संग्रामने एकूण पुशअप्स 75 मारून दाखवल्यानंतर संग्राम म्हणतो,”हे तर काहीच नाही एकावेळी पाचशे मारतो मी!” त्यावर आर्या आश्चर्यचकित होतो. बाप रे एवढे!, असं ती म्हणते.

संग्राम चौगुलेने सूरज चव्हाण याला बॉडी बनवायच्या ट्रिक सांगितल्या आहेत. अगरबत्ती लावून पुशप्स करायचे. जो पर्यंत अगरबत्ती चालू आहे आहे तो पर्यंत करायचे. त्यानंतर पुढे संग्राम सूरजला डंबल्स घेऊन सेट कसे मारायचे हे शिकवत आहे. सुरज म्हणतो की, मी फोनमध्ये बघितले आहे. मला पण असे अंगाला तेल लावून बॉडी दाखवायची आहे. संग्रामच्या या शिकवणीला बाकी घरचे सदस्य कोच बदलला असे म्हणत आहेत. तेच गार्डन एरियात अंकिता आणि निक्की बसलेल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

निक्की काय म्हणाली?

निक्की अंकिताला म्हणते की, बघू आता गेम कसा खेळतो ते. तुला काय वाटते कशासाठी पाठवले असेल? त्यावर अंकिता म्हणाली, काय माहिती मला तर काही समजलेच नाही अजून. मी बोलली पण नाही त्याच्यासोबत. तू भांडणामध्ये तरी बोलली होतीस…. त्यावर निक्की निक्की तिला उत्तर देते. मला त्याचे रिझन पटले नाही. मी ‘बिग बॉसला म्हणाली की हा कुठला सिंघम आहे.. हा तर पप्पू आहे, असं निक्की म्हणते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;