कंगना राणौतच्या अडचणी वाढल्या ? जावेद अख्तर यांचा मानहानीचा खटला विशेष न्यायालयात दाखल

कंगना राणौतच्या अडचणी वाढल्या ? जावेद अख्तर यांचा मानहानीचा खटला विशेष न्यायालयात दाखल

बॉलीवूडमधील विख्यात लेखक, गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री, खासदार कंगना राणौत यांच्यातील वाद सर्वांनाच माहीत आहे. कंगना राणौत या सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत किंवा वादात सापडलेल्या असतात. आता पुन्हा एका मोठ्या कारणामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. लोकप्रिय गीतकार जावेद अख्तर यांच्यासोबत कंगना यांचा वाद झाला असून ते प्रकरण कोर्टात गेलं होतं. जावेद अख्तर यांनी कंगन यांच्याविरुद्ध मानहानीची तक्रारही दाखल केली होती. त्याप्रकरणाची सुनावणी आता वांद्रे येथील विशेष न्यायालयात होणार आहे. कंगना राणौत आता खासदार झाल्याने , त्या ज्या प्रकरणांमध्ये पक्षकार आहे ती प्रकरणे अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडून वांद्रे येथील न्यायालयात हस्तांतरित करण्यात आली आहेत.

हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगाना यांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती आणि ती निवडणूक जिंकून त्या खासदार बनल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर आता हा निर्णय घेण्यात आला आहे. सदर कोर्ट हे खासदार व आमदारांचा समावेश असलेली प्रकरणं हाताळतं. मुंबईतील मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने अंधेरी कोर्टातील भाजप खासदाराशी संबंधित सर्व खटले या विशेष दंडाधिकारी न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.

2021 साली सप्टेंबर महिन्यात कंगना राणौत यांनी ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्यावर गुन्हेगारी धमकीचा आरोप केला होता. कंगना यांचा सहकलाकार असलेला हृतिक रोशनशी तिचा झालेला वाद जगजाहीर आहे. या सार्वजनिक वादानंतर अख्तर यांनी कंगना व त्यांची बहीण यांना त्यांच्या जुहूतील निवासस्थानी बोलावले , त्यांना धमकावले आणि लेखी माफी मागण्यास भाग पाडले. असा आरोप कंगना यांनी केला होता. तेव्हा हृतिक आणि कंगना त्यांच्या काही ई-मेलमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.

तर जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आणि माझ्या प्रतिष्ठेला हानि पोहोचवली, असा दावा जावेद अख्तर यांनी केला. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर एका मुलाखतीत कंगना यांनी अख्तर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. ज्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. त्यावरूनही अख्तर यांनी आरोप केला होता. आता हे प्रकरण वांद्रे येथील न्यायालयात हस्तांतरित करण्यात आले असून तेथे सुनावणी होईल.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;