मला तुमची जबाबदारी नको, अवमानास्पद वागणूकही नको! मुलुंडचा बोलका पोपट कमळाबाईवर नाराज

मला तुमची जबाबदारी नको, अवमानास्पद वागणूकही नको! मुलुंडचा बोलका पोपट कमळाबाईवर नाराज

मुलुंडचा बोलका पोपट म्हणून पुख्यात असलेले किरीट सोमय्या कमळाबाईवर नाराज झाले आहेत. कारण इतकी वर्षे कमळाबाईच्या आदेशाने विरोधकांविरुद्ध त्यांनी राळ उठवली, खोटे आरोप केले त्या सोमय्यांना आता भारतीय जनता पक्षात पिंमत राहिलेली नाही. निवडणूक प्रचार समितीमध्ये त्यांना नगण्य स्थान दिल्याने त्यांची नाराजी बाहेर पडली. त्यांनी लेखी पत्र लिहून ती जबाबदारी नाकारली. पुन्हा अशा प्रकारची अपमानास्पद वागणूक देऊ नये, असेही त्यांनी सांगितले.

भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी व्यवस्थापन समिती बनवली आहे. त्यात किरीट सोमय्या यांना अगदीच कमी दर्जाची किंबहुना क्रीम पोस्ट नसलेली निवडणूक आयोग संपर्पप्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे.

सोमय्यांनी या नव्या जबाबदारीची घोषणा होताच तातडीने निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पत्र पाठवले. मला न विचारता ही घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे. मला अमान्य आहे. आपण या कामासाठी अन्य कुणाची तरी नियुक्ती करावी. 18 फेब्रुवारी 2019 पासून गेली साडेपाच वर्षे पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करत आहे. आता मला ही नवी जबाबदारी नकोच आणि निवडणूक प्रचार समिती अध्यक्षांनी किंवा प्रदेशाध्यक्षांनी पुन्हा अशी अपमानास्पद वागणूक देऊ नये, असे सोमय्या यांनी पत्रात म्हटले आहे. चित्रा वाघ, नितेश राणे, प्रसाद लाड यांना स्थान नाही

इतर पक्षांमधून भाजपात आलेल्या चित्रा वाघ, नितेश राणे, प्रसाद लाड यांना निवडणूक व्यवस्थापन समितीमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्यामध्येही नाराजी असल्याचे बोलले जात आहे. भाजपात येऊन चूक तर केली नाही ना अशी त्यांचीही भावना बनली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;