धाड टाकून मला अटक करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न, अनिल देशमुख यांचा आरोप

धाड टाकून मला अटक करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न, अनिल देशमुख यांचा आरोप

माझ्यावर धाड टाकून मला अटक करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. तसेच दिल्लीच्या मदतीने माझ्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे असा आरोपही देशमुख यांनी केला.

एक्सवर पोस्ट करून अनिल देशमुख म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षांपूर्वीची घटना उकरुन काढून माझ्याविरुध्द दिल्लीच्या मदतीने CBI FIR दाखल केली आहे. चार वर्षांपूर्वी मी गृहमंत्री असतांना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजपचे नेते गिरीष महाराज यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता, हा माझ्यावर आरोप आहे असे देशमुख म्हणाले.

तसेच माझ्या माहितीनुसार माझ्यावर रेड टाकून मला अट‍क करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करीत आहेत. ज्या देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या मदतीने ED-CBI ला हाताशी धरुन महाराष्ट्राचे राजकारण अतिशय खालच्या स्तरावर आणले. त्यांना सांगू इच्छितो की, देवेंद्र फडणवीस मी माझ्या अटकेची वाट पाहत आहेत असेही देशमुख यांनी नमूद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;