राहुल वैद्य-दिशा परमारला एकाच आजाराची लागण; चाहत्यांकडून काळजी व्यक्त

राहुल वैद्य-दिशा परमारला एकाच आजाराची लागण; चाहत्यांकडून काळजी व्यक्त

गायक राहुल वैद्यने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट लिहित प्रकृतीविषयी माहिती दिली होती. राहुलला डेंग्युची लागण झाल्याचं त्याने सांगितलं होतं. ही पोस्ट वाचल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता त्याने आणखी एक पोस्ट लिहित पत्नी आणि अभिनेत्री दिशा परमारलाही डेंग्युची लागण झाल्याचं सांगितलं आहे. राहुल गेल्या काही दिवसांपासून ‘लाफ्टर शेफ्स’ या शोसाठी शूटिंग करत आहे. या शूटिंगदरम्यानचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये राहुलच्या डोक्यावर कापडाची पट्टी बांधली होती. त्यानंतर राहुलने खुलासा केला होता की त्याला डेंग्युचा ताप आहे.

आता एका नव्या पोस्टमध्ये राहुलने म्हटलंय की त्याच्या पत्नीलाही डेंग्युची लागण झाली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये राहुलने लिहिलंय, ‘फक्त मला डेंग्यु झाल्याचं पुरेसं नव्हतं का? आता दिशालाही त्याची लागण झाली आहे.’ दिशानेही तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये तापाने फणफणत असल्याचं म्हटलंय. ‘कोणालाच डेंग्युच्या त्रासाचा सामना करावा लागू नये अशी मी आशा करते. भयंकर वेदना, सतत 103 डिग्रीचा ताप, हे सगळ्यात वाईट आहे’, असं तिने लिहिलंय. दिशा आणि राहुलची ही पोस्ट वाचून अनेकांनी त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली आहे.

राहुल आणि दिशा यांना एक मुलगीसुद्धा आहे. गेल्या वर्षी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावरच दिशाने मुलीला जन्म दिला होता. त्यामुळे यंदाचाही गणेशोत्सव या दोघांसाठी खास ठरणार होता. दोघांनी त्यासाठी बरंच काही प्लॅनसुद्धा केलं होतं. या गोष्टीचा आनंद राहुलने ‘लाफ्टर शेफ्स’ या शोमध्ये व्यक्त केला होता. राहुल आणि दिशा यांनी 16 जुलै 2021 रोजी लग्न केलं. मुंबईत धूमधडाक्यात हा लग्नसोहळा पार पडला होता. लग्नाआधी दोघं एकमेकांना काही वर्षांपासून डेट करत होते. बिग बॉसच्या 14 व्या सिझनमध्ये राहुलने दिशाला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. लग्नानंतर 20 सप्टेंबर 2023 रोजी दिशाने नव्याला जन्म दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by RAHUL VAIDYA (@rahulvaidyarkv)

राहुल हा प्रसिद्ध गायक आणि संगीतकार आहे. त्याने ‘इंडियन आयडॉल’ या प्रसिद्ध रिॲलिटी शोमधून करिअरची सुरुवात केली. तो ‘बिग बॉस 14’ आणि ‘खतरों के खिलाडी 11’ या रिॲलिटी शोजमध्येही झळकला. तर दुसरीकडे दिशाला ‘बडे अच्छे लगते है 2’ या मालिकेतून लोकप्रियता मिळाली. यामध्ये तिने नकुल मेहतासोबत काम केलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;