Chandrapur news – कार्यालय की जुगार अड्डा? महावितरण उपकार्यकारी अभियंता कार्यालयात पत्त्याचा डाव रंगला

Chandrapur news – कार्यालय की जुगार अड्डा? महावितरण उपकार्यकारी अभियंता कार्यालयात पत्त्याचा डाव रंगला

महावितरण उपकार्यकारी अभियंता कार्यालयामध्ये पत्त्याचा डाव रंगल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात शेवटच्या टोकाला असलेल्या जिवती तालुक्यातील हा व्हिडीओ आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ जिवती तालुक्यातील महावितरण उपकार्यकारी अभियंता कार्यालयातील आहे. ज्या कार्यालयात बसून जनतेचे प्रश्न सोडवायचे, तिथेच टेबलवर बसून जुगार खेळला जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या टेबलवर बसून कार्यालयातील प्रधानतंत्र रवींद्र गंधारे आपल्या तीन मित्रांसोबत जुगार खेळताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

जिवती तालुका हा दुर्गम भागात आहे. आदिवासी बहुल असणाऱ्या या तालुक्यातील बहुतांश भाग डोंगराळ आहे. सोसाट्याचा वारा सुटला तरी इथे अनेक गावांची बत्ती गुल होते. दोन-तीन दिवस वीजपुरवठा खंडित असतो. एकीकडे हे प्रश्न असताना दुसरीकडे कार्यालयातच पत्त्याचा डाव रंगल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी घेऊन कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला होता. संतापलेल्या नागरिकाकडून कार्यालयाची तोडफोड सुद्धा झाली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;