Chandrapur News कार्यालय आहे की जुगार अड्डा? महावितरण उपकार्यकारी अभियंता कार्यालयात रात्रीस खेळ चाले

Chandrapur News कार्यालय आहे की जुगार अड्डा? महावितरण उपकार्यकारी अभियंता कार्यालयात रात्रीस खेळ चाले

चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या जिवती तालुक्यातील एक व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरलं झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

हा व्हिडीओ महावितरण उपकार्यकारी अभियंता कार्यालय जिवतीचा आहे.जिथे बसून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवायला हवे, त्याच टेबलावर जुगार खेळला जात आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांचा टेबलावर बसून कार्यालयातील मुख्यतंत्रज्ञ रवींद्र गंधारे आपल्या तीन मित्रांच्या सोबतीने जुगार खेळत आहेत.जिवती तालुका अति मागास ,दुर्गम, डोंगराळ, व आदिवासी बहुल क्षेत्र असलेला तालुका आहे.जोराचा हवा आला की तालुक्यातील अनेक गावांची बत्तीगुल होते. दोन-तीन दिवस विद्युत पुरवठा खंडित असतो. मात्र इथले अधिकारी जनतेचे प्रश्न सोडविण्या ऐवजी जुगार खेळण्यात दंग असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी विद्युत पुरवठा सुरळीत ठेवा ही मागणी घेऊन कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला होता. संतापलेल्या नागरिकांकडून कार्यालयाची तोडफोड सुद्धा झाली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;