कोपरगावात गावठी कट्ट्याच्या धाकाने मजुरास लुटले; चौकडीविरोधात गुन्हा दाखल

कोपरगावात गावठी कट्ट्याच्या धाकाने मजुरास लुटले; चौकडीविरोधात गुन्हा दाखल

कोपरगावमध्ये सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास धारणगाव रोड येथून जात असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करून दहशत निर्माण केली. गावठी कट्टा दाखवत धमकावत तरुणाच्या गळयातील सोन्याची चैन लुटण्यात आली. ही लूटमार करणाऱ्या चौघांविरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहारूख रज्जाक शेख (रा. वार्ड न.२ श्रीरामपुर), तौफिक सत्तार (रा. वार्ड नंबर २ श्रीरामपुर), तन्वीर रंगरेज (रा. सुभाषनगर कोपरगाव), जान मंहमद मेमन (रा. वार्ड न. २ श्रीरामपुर) अशी पसार झालेल्या आरोपींची नावे आहेत.

गांधीनगर येथे राहणारा मजुरी करणारा तरुण नाजिम इस्लाउद्दीन शेख (वय 26) मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास या रसत्याने जात होते. गजबजलेल्या धारणगाव रोड परिसरात विना नंबरच्या ईरटीगा गाडीतून आलेल्या चौघांनी त्याला अडविले. जुना वाद उकरून काढत त्यांनी शेख यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. परिसरात दहशत निर्माण करत शेख यांच्या गळयातील सोन्याची चैन बळजबरीने काढून घेत आरोपी शाहारुखने गावठी कट्ट्याचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी पसार झाले. याप्रकरणी नाजिम शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलिसात या चौकटीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई संजय पवार हे पुढील तपास करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;