Latur News: प्रेम नाकारलं म्हणून केला चुकीचा स्पर्श, मुलीच्या रौद्र रुपामुळे थेट घरी सोडलं; दोन जणांवर पोस्को गुन्हा दाखल

Latur News: प्रेम नाकारलं म्हणून केला चुकीचा स्पर्श, मुलीच्या रौद्र रुपामुळे थेट घरी सोडलं; दोन जणांवर पोस्को गुन्हा दाखल

अहमदपूर तालुक्यातील एका गावामधील दोन तरुणांनी एका अल्पवयीन मुलीला रात्री आठ वाजता मोबाईल फोन फोन करून घराबाहेर बोलवलं. त्यानंतर गावा बाहेरील पुलावर घेऊन जाऊन वाईट हेतुने स्पर्श केला असल्याची घटना 6 सप्टेंबर रोजी घडली. दरम्यान या प्रकरणी अहमदपूर पोलिसात दोन तरुणांविरुद्ध बाल लैगिक प्रतिबंध कायदा पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याविषयी पोलीस सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार अहमदपूर तालुक्यातील एका गावात गावातील दोन तरुणांनी 6 सप्टेंबर रोजी गावातीलच एका अल्पवयीन मुलीला रात्री आठ वाजता मोबाईलवर फोन करून घराबाहेर बोलावुन घेतले व मोटार सायकलवर बसवुन गावाबाहेर असलेल्या एका पुलावर घेऊन गेले. त्यातील एकाने मी तुझ्यावर प्रेम करतो तू माझ्या सोबत चल म्हणाला असता मुलीने नकार देताच वाईट हेतूने मुलीच्या हाताला धरून जवळ ओढले. मुलीने नकार देताच मुलीच्या गालावर चापटा मारून जिवे मारण्याची धमकी दिली तेव्हा मुलगी म्हणाली मला घरी नेऊन सोड नाही तर मी आरडा ओरडा करेल. तेव्हा मुलीचं रौद्र रुप आणि स्पष्ट मत त्याने व त्याच्या मित्राने त्या मुलीला घरी नेऊन सोडले. हा घडलेला सगळा प्रकार मुलीच्या आजोबांना कळला असता जाब विचारण्यासाठी गेलेल्या आजोबांना तरुणांनी जिवे मारण्याची धमकी दिली. अल्पवयीन पीडितेने दिलेल्या फिर्यादी वरून अहमदपूर पोलिसांत दोन तरुणाविरूद्ध भारतीय न्याय दंड संहिता कलम 74, 352 ,351 व बाल लैंगिक प्रतिबंध कायदा पोस्को अंतर्गत 2012 ,8/ 12 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक ए एन श्रीमंगले हे करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;