ऐश्वर्या रायच्या सहअभिनेत्याने लग्नाच्या 15 वर्षांनंतर घेतला घटस्फोट; म्हणाला ‘घाईगडबडीत..’

ऐश्वर्या रायच्या सहअभिनेत्याने लग्नाच्या 15 वर्षांनंतर घेतला घटस्फोट; म्हणाला ‘घाईगडबडीत..’

अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटात काम करणारा प्रसिद्ध तमिळ अभिनेता जयम रवी याने पत्नीला घटस्फोट दिला आहे. लग्नाच्या 15 वर्षांनंतर पत्नी आरती रवीपासून विभक्त होत असल्याचं त्याने सोशल मीडियावर जाहीर केलंय. जयम आणि आरती यांना दोन मुलं आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या. अखेर सोमवारी जयमने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चर्चांना पूर्णविराम दिला. वैयक्तिक कारणांमुळे आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्याने या पोस्टमध्ये स्पष्ट केलंय.

एक्स (ट्विटर) अकाऊंटवर जयम रवीने दोन पोस्ट लिहिले आहेत. ‘तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आणि मला समजून घेतल्याबद्दल धन्यवाद’, असं कॅप्शन देत त्याने हे पोस्ट लिहिले आहेत. आयुष्य हे कशा पद्धतीने विविध अध्यायांचा प्रवास असल्याचं सांगत त्याने जड अंत:करणाने ही वैयक्तीक माहिती देत असल्याचं म्हटलंय. ‘बराच विचार आणि चर्चेनंतर मी पत्नीला घटस्फोट देण्याचा अत्यंत कठीण निर्णय घेतला आहे. हा निर्णय घाईगडबडीत घेतला गेलेला नाही. त्यामागे काही वैयक्तिक कारणं असून यातच सर्वांचं भलं आहे असा मला विश्वास आहे’, असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलंय. रवीने चाहत्यांना त्याच्या खासगी आयुष्याबद्दल आदर करण्याची आणि त्याच्या लग्नाबाबत कोणतेही पूर्वग्रह न बाळगण्याची विनंती केली आहे.

‘या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या खासगी आयुष्याचा आदर करा. कोणतेही पूर्वग्रह बाळगू नका, अफवांवर आणि आरोपांवर विश्वास ठेवू नका. हे प्रकरण खासगीच राहू द्या’, असं त्याने पुढे लिहिलंय. यावर्षी जून महिन्यात लग्नाच्या पंधराव्या वाढदिवसानंतर आरतीने सोशल मीडियावरून पतीसोबतचे सर्व फोटो डिलिट केले होते. आरती ही प्रसिद्ध टेलिव्हिजन निर्मात्या सुजाता विजयकुमार यांची मुलगी आहे. जयम रवी आणि आरतीने 2009 मध्ये लग्न केलं होतं.

जयम रवी नुकताच ‘पोन्नियिन सेल्वन 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘इराइवान’ आणि ‘सायरन’ हे त्याचे चित्रपटसुद्धा प्रदर्शित झाले होते. तो लवकरच ‘ब्रदर’ आणि ‘कदलिका नेरामलाई’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. जयम रवीने ऐश्वर्या राय आणि कंगना राणौत यांच्यासोबतही काम केलंय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;