18 ऑक्टोबरपासून प्रो कबड्डी धमाका

18 ऑक्टोबरपासून प्रो कबड्डी धमाका

कबड्डीला आंतरराष्ट्रीय पातळीवर ग्लॅमर मिळवून देणाऱ्या प्रो कबड्डी लीगच्या अकराव्या मोसमाचा धमाका येत्या 18 ऑक्टोबरपासून होणार आहे. तेलुगु टायटन्स विरुद्ध बंगळुरू बुल्स यांच्यातील लढतीने स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.

यंदाच्या मोसमात प्रो कबड्डी लीग पुन्हा एकदा तीन शहरांमध्ये खेळविली जाणार असून 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2024 दरम्यान हैदराबाद येथील गच्ची बावली इनडोअर स्टेडियममध्ये पहिले सत्र पार पडेल तर स्पर्धेचे दुसरे सत्र 10 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2024 दरम्यान नोएडा इनडोअर स्टेडियम येथे होणार आहे.  स्पर्धेचे तिसरे सत्र पुण्यातील बालेवाडी बॅडमिंटन स्टेडियम येथे 3 ते 24 डिसेंबर 2024 दरम्यान खेळविले जाणार असल्याचे माहिती ‘मशाल स्पोर्ट्स’ने दिली.

या प्रो कबड्डी लीगचा प्रत्येक मोसम कोट्यवधी कबड्डीप्रेमींना समोर ठेवून आखला जातो. यावेळी त्याच दृष्टीने स्पर्धेची आखणी ‘मशाल स्पोर्ट्सचे प्रमुख व प्रो कबड्डी लीगचे कमिशनर अनुपम गोस्वामी यांनी केली. प्रो कबड्डी लीगच्या अकराव्या मोसमासाठीचा लिलाव मुंबई येथे 15 व 16 ऑगस्ट 2024 रोजी पार पडला. आठ खेळाडूंनी एक कोटीची मर्यादा ओलांडल्यामुळे हा लिलाव ऐतिहासिक ठरला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;