घराचे गिफ्ट डीड रद्द करता येणार नाही, ज्येष्ठ नागरिक प्राधिकरणाचे आदेश रद्द; हायकोर्टाचा निर्वाळा

घराचे गिफ्ट डीड रद्द करता येणार नाही, ज्येष्ठ नागरिक प्राधिकरणाचे आदेश रद्द; हायकोर्टाचा निर्वाळा

आईवडिलांनी आधारहीन आरोप केल्यास त्या आधारावर घराचे गिफ्ट डीड रद्द करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निर्वाळा देत न्यायालयाने ज्येष्ठ नागरिक प्राधिकरणाचे गिफ्ट डीड रद्द करण्याचे आदेश रद्दबातल ठरवले.

न्या. आर. एम. जोशी यांच्या एकलपीठासमोर ही सुनावणी झाली. मुलगा किंवा मुलगी नीट काळजी घेत नाही, मूलभूत गरजा पूर्ण करत नाही या आईवडिलांच्या आरोपांचे ठोस पुरावे सादर न झाल्यास प्राधिकरणाला गिफ्ट डीड रद्द करण्याचा कोणताच अधिकार नाही, असे न्यायालयाने नमूद केले. आईवडिलांची फसवणूक करून माझ्या पतीच्या नावाने गिफ्ट डीड करून घेतली की नाही हे ठरवण्याचा अधिकार प्राधिकरणाला नाही. मुळात आई आमच्यासोबतच राहील अशी हमी आम्ही कोर्टात दिल्याचा दावा मुलीने केला. गिफ्ट डीडवर आदेश देण्याचे अधिकार प्राधिकरणाला आहेत. जावई आईची काळजी घेत नव्हते, असा स्पष्ट आरोप प्राधिकरणाच्या सुनावणीत करण्यात आला होता. मुळात प्राधिकरण हे ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठीच आहे. गिफ्ट डीड रद्द करण्याचे प्राधिकरणाचे आदेश योग्यच आहेत, असा युक्तिवाद आईकडून करण्यात आला होता.

 काय आहे प्रकरण

आईने मुलीला घर दिले होते. तशी गिफ्ट डीड केली होती. याप्रकरणी दिवाणी दावा सुरू आहे. त्यातही आईने प्रतिज्ञापत्र सादर केले होते. स्वतःच्या  मर्जीने व मुलीवर प्रेम असल्याने तिला घर दिल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. मला घर दिल्याचे बहिणीला कळाले. तिने माझ्याविरोधात ज्येष्ठ नागरिक प्राधिकरणाकडे तक्रार करण्यासाठी आईवर दबाव टाकला. घराची गिफ्ट डीड रद्द करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली. प्राधिकरणाने हे गिफ्ट डीड रद्द केले. त्याविरोधात ही याचिका केली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;