लेक झाली दुर्गा – रिक्षा आईच्या अंगावर पडली; लेकीने उचलली

लेक झाली दुर्गा – रिक्षा आईच्या अंगावर पडली; लेकीने उचलली

एखादी माऊली आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असते. परंतु कर्नाटकातील मंगळुरू येथे लेकच आईचा जीव वाचवण्यासाठी दुर्गा झाल्याची प्रचीती आली. मंगळुरूतील किन्नीगोली भागात घडलेल्या एका अपघाताचा भीषण व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मुलीच्या डोळ्यांदेखत आईचा भीषण अपघात झाला, पण मुलीने क्षणाचाही विलंब न करता रिक्षा उचलली. लेकीच्या प्रयत्नांमुळे महिला सुखरूप बचावली.

टय़ूशन क्लासला गेलेल्या आपल्या मुलीला घरी परत आणण्यासाठी जाणाऱ्या महिलेला रस्ता ओलांडत असताना ऑटो रिक्षाने जोरदार धडक दिली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पैद झाली. भरधाव रिक्षाने या महिलेला जोरदार धडक दिली आणि ती जमिनीवर कोसळली. रिक्षा महिलेच्या अंगावर पडली. हा अपघात तिच्या अल्पवयीन मुलीच्या डोळ्यांसमोरच घडला. सुरुवातीला मुलगीही थोडी घाबरली, परंतु धीर एकवटून तिने क्षणाचाही विलंब न करता आईच्या दिशेने धावली आणि रिक्षा उचलून धरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या अपघाताचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून मुलीच्या असामान्य शौर्याचे कौतुक होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;