इंजिनीअरिंगचे नियमबाह्य प्रवेश रद्द होणार! ‘कॅप’पूर्वीच खुलासा करण्याचा ‘डीटीई’चा आदेश

इंजिनीअरिंगचे नियमबाह्य प्रवेश रद्द होणार! ‘कॅप’पूर्वीच खुलासा करण्याचा ‘डीटीई’चा आदेश

सीईटी सेलकडून इंजिनीअरिंग प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या नियमित प्रवेश फेऱ्या (कॅप) संपण्यापूर्वी रिक्त राहणाऱ्या जागांवर संस्थास्तरावर प्रवेश दिल्या प्रकरणी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील 15 अभियांत्रिकी महाविद्यालयांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. या महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रियेचा तत्काळ खुलासा करण्याचे आदेश तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) दिले आहेत. या कॉलेजांमध्ये नियमबाह्य पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली असल्यास विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होण्याची शक्यता आहे.

सीईटी सेलकडून राज्यातील इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार तिसरी प्रवेश फेरी आज संपली आहे. प्रवेश प्रक्रियेच्या नियमानुसार तिसरी फेरी संपल्यानंतर कॉलेजांमध्ये जागा रिक्त राहतात. या जागांवर प्रवेशासाठी संस्थास्तरावर प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत सीईटी सेलने नियमावली केली आहे. मात्र इंजिनीअरिंग कॉलेजांनी सीईटी सेलच्या नियमांना केराची टोपली दाखवत कॅप राऊंड संपण्यापूर्वीच प्रवेश प्रक्रिया राबविली आहे. यामध्ये मोठय़ा प्रमाणावर आर्थिक व्यवहार करून, कमी गुणांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत पुणे आणि पिंपरी-चिंचवड इंजिनीअरिंग कॉलेजांची सीईटी सेलकडे युवासेनेच्यामार्फत सहसचिव कल्पेश यादव यांनी तक्रार दाखल केली होती.

नोटीस पाठविण्यात आलेले इंजिनीअरिंग कॉलेज

z        डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, आकुर्डी

z        डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट रिसर्च, आकुर्डी

z        डॉ. डी.वाय. पाटील इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी

z        अजिंक्य डी.वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट, लोहगाव

z        इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट

z        पुणे विद्यार्थी गृहाचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, पुणे

z        ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, वाघोली

z        गेनबा सोपानराव मोझे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, वाघोली

z        गेनबा सोपानराव मोझे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, बालेवाडी

z        मराठवाडा मित्र मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, कर्वेनगर

या तक्रारीच्या अनुषंगाने सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांना कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार डीटीईच्या पुणे विभागीय कार्यालयाचे अधिकारी मा.रा. जाधव यांनी 13 इंजिनीअरिंग कॉलेजांच्या प्राचार्यांना नोटीस पाठवत तत्काळ खुलासा पाठविण्याचे आदेश दिले आहेत. संस्थेने नियमबाह्य पद्धतीने प्रवेश झाल्यास, संबंधित प्रवेश रद्द करण्यात येतील, याची गंभीर दखल घ्यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या कॉलेजांवर सीईटी सेल आणि डीटीईकडून काय कारवाई करण्यात येते, याकडे लक्ष लागले आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाने हे कागदोपत्री आदेश दिले आहेत, त्याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना झाला पाहिजे. यासाठी सीईटी कमिशनर, एफआरए यांनी निरीक्षक नेमला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने ही प्रक्रिया पारदर्शक होईल, चौकशी समिती नेमून त्यामध्ये गुन्हे शाखेतील व्यक्तीचीही नियुक्ती केली पाहिजे. – कल्पेश यादव, युवासेना सहसचिव

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;