सोमय्या भ्रष्टाचारी पकडून आणतात अन् फडणवीस त्यांना पक्षात घेतात, जरांगे पाटील यांचे पुन्हा भाजपवर टिकास्त्र

सोमय्या भ्रष्टाचारी पकडून आणतात अन् फडणवीस त्यांना पक्षात घेतात, जरांगे पाटील यांचे पुन्हा भाजपवर टिकास्त्र

सरकार कसे बनवायचे हे फडणवीसांना माहित आहे. किरीट सोमय्या भ्रष्टाचारी पकडून आणतात आणि फडणवीस त्यांना पक्षात घेतात. फडणवीस माणुसकी जिवंत करा आणि आरक्षण द्या, नाही तर तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. बीड येथील घोंगडी बैठकीत ते बोलत होते.

आज बीडच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर आयोजित भाषणात जरांगे यांनी पुन्हा फडणवीस यांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, भाजपतील मराठा आता फडणवीस यांच्यापासून दूर चालला आहे. भाजपच्या माजी आमदारांची रांग लागत आहे. त्यांचे आमदार रात्रीच भेटायला येतात. भाजपमध्ये लवकरच मोठा स्फोट होणार असा दावा त्यांनी केला. भाजपच्या पुण्यातील एका नेत्याने तर फ्लॅट विकला पण त्याला तिकीट मिळणार नाही, असे ते म्हणाले.

बीडच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत केलेली पाडापाडी योग्य होती. जनतेला प्राधान्य देणारा हा जिल्हा आहे. आधी जात आणि नंतर पक्ष, जातीला पाठ दाखवून मागे फिरायचे नाही, असेही त्यांनी बजावले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;