‘आई तुळजाभवानी’ मालिकेत ही अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

‘आई तुळजाभवानी’ मालिकेत ही अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

आई तुळजाभवानीचा उदो उदो… कलर्स मराठी वाहिनीवर ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भक्तांच्या हाकेला धावून येणार, दुर्जनांच्या नाशासाठी अष्टभुजा ‘आई तुळजाभवानी’ प्रकटणार. ‘आई तुळजाभवानी’ मालिकेचा प्रोमो टीझर आज रात्री 9.25 वाजता ‘कलर्म मराठी’वर प्रदर्शित झाला आहे. ‘आई तुळजाभवानी’च्या रुपात कोण दिसणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे. अवघ्या महाराष्ट्राची ‘कुलस्वामिनी’ अर्थात ‘आई तुळजाभवानी’ लवकरच प्रेक्षकांना आपल्या लाडक्या ‘कलर्स मराठी’वर पाहायला मिळणार आहे.

आध्यात्मिक – धार्मिक मालिकांची मोठी परंपरा मराठी टेलिव्हिजन विश्वाला आहे. गेली अनेक वर्ष अत्यंत लोकप्रिय यशस्वी धार्मिक – आध्यात्मिक मालिका सातत्याने देणाऱ्या कलर्स वाहिनीने आता एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे. अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी ‘आई तुळजाभवानी’ची गाथा या मालिकेच्या माध्यमातून उलगडणार आहे. ‘आई तुळजाभवानी’च्या रुपात प्रसन्न देखणेरूप लाभलेली अभिनेत्री पूजा काळे दिसणार आहे. पूजा भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने विशारद पूर्ण केले आहे. तसेच कथ्थकचंही शिक्षण तिने घेतलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

‘आई तुळजाभवानी’ मालिकेचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाल्यापासून ही मालिका विशेष चर्चेत आहे. त्याचा पुढचा टप्पा असलेला भव्यदिव्य प्रोमो प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असून लेकरांच्या हाकेला त्वरित धावून भूतलावर अवतरणाऱ्या ‘आई तुळजाभवानी’चं अद्भुत,अलौकिक रूप त्यात पाहायला मिळत आहे. दुर्जनांचा कळीकाळ ठरलेल्या मातेच्या रौद्ररुपाचे, एका हाकेवर उभ्या ठाकणाऱ्या आदिमायेच्या अष्टभुज रुपाचे भव्य दर्शन या मालिकेच्या भव्यतेची साक्ष आहे.

‘आई तुळजाभवानी’ मालिकेतल्या मुख्य भूमिकेबद्दल पूजा काळे म्हणाली, “आई तुळजाभवानी’ची भूमिका साकारताना आसपास खूप सकारात्मक ऊर्जा जाणवतेय. पहिली मालिका आणि आव्हानात्मक भूमिका साकारणं ही एक मोठी जबाबदारी आहे. मालिकेची संपूर्ण अनुभवी टीम आणि तिचे नेतृत्व करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने यांच्या मार्गदर्शनाने ‘आई तुळजाभवानी’ ही भूमिका मनापासून साकारुन प्रेक्षकांच्या विश्वासाला सार्थ उतरेन असा दृढ विश्वास मी व्यक्त करते.” अवघ्या महाराष्ट्राची ‘कुलस्वामिनी’ झाली ‘आई तुळजाभवानी’ लवकरच ‘कलर्स मराठी’वर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;