अक्षय कुमारचं चाहत्यांना सरप्राईज! वाढदिवसाला केली नव्या चित्रपटाची घोषणा

अक्षय कुमारने आज वाढदिवसानिमित्त आपल्या चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं आहे. अक्षय कुमारचा आज वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त अक्षयने नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यासोबतच त्या चित्रपटाचा फर्स्ट लुक पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे.

अक्षयने आज आपल्या वाढदिवसानिमित्त त्याचा आगामी चित्रपट ‘भूत बंगला’ ची घोषणा केली आहे. यासोबतच त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटला व्हिडिओ पोस्ट करत या हॉरर कॉमेडी चित्रपटाची पहिली झलकही दाखवत चाहत्यांना सरप्राईज केलं आहे. या पोस्टमध्ये अक्षय हॉरर बॅग्राउंडसह तो एक काळ्या मांजरीबरोबर दिसत आहेत. आणि मनोरंजक गोष्ट म्हणजे या चित्रपटाचे निर्देशन प्रियदर्शन यांनी केलं आहे.

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)


वर्षानुवर्षे माझ्या वाढदिवशी तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद! ‘भूत बांगला’च्या फर्स्ट लुकसह हे वर्ष साजरे करत आहे! 14 वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रियदर्शनसोबत काम करण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. मोठ्या कालावधीनंतर एक स्वप्न पूर्ण होत आहे. हा अविश्वसनीय प्रवास तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी उत्सुक आहे. जादूसाठी तयार रहा, असं मजेशीर कॅप्शन अक्षयने पोस्टला दिलं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;