अजितदादा गटाच्या जिल्ह्याध्यक्षांची भररस्त्यात दादागिरी, तरुणाला मारहाण करत तीक्ष्ण हत्याराने हल्ला

अजितदादा गटाच्या जिल्ह्याध्यक्षांची भररस्त्यात दादागिरी, तरुणाला मारहाण करत तीक्ष्ण हत्याराने हल्ला

कार बाजूला घेण्याच्या वादातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी भररस्त्यात तरुणावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भरत गंगोत्री यांची दादागिरी मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात भरत गंगोत्री आणि त्यांच्या 5 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगर कॅम्प नंबर 2 मध्ये मधुबन चौकात हा सर्व प्रकार घडला. क्रिश बजाज नामक तरुणाची कार रस्त्यात बंद पडली होती. ही कार बाजूला घेण्यावरून क्रिश बजाज आणि भरत गंगोत्री यांच्यात वाद झाला.

या वादाचे नंतर हाणामारीत रुपांतर झाले. गंगोत्री यांच्या एका साथीदाराला मारहाण करण्यात आली. यानंतर गंगोत्री यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी क्रिश बजाजला मारहाण केली. गंगोत्री एवढ्यावरच थांबले नाहीत. मारहाणीनंतर क्रिशवर तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला केला.

या हल्ल्यात क्रिश बजाज हा जखमी झाला. क्रिशला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;