काँग्रेस सोडून दे नाहीतर…; कुस्तीपटू बजरंग पुनियाला जीवे मारण्याची धमकी

काँग्रेस सोडून दे नाहीतर…; कुस्तीपटू बजरंग पुनियाला जीवे मारण्याची धमकी

हिंदुस्थानचा स्टार कुस्तीपटू आणि काँग्रेस नेता बजरंग पूनियाला अनोळखी नंबरवरून जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून बजरंगने तत्काळ सोनीपत बहलगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर बजरंग पुनियाला व्हॉट्सअ‍ॅपवर धमकीचा मेसेज आला आहे. मेसेजमध्ये लिहले आहे की, बजरंग काँग्रेस सोडून दे नाहीतर तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे चांगले होणार नाही. हा आमचा शेवटचा मेसेज आहे. निवडणुकीपूर्वी आम्ही दाखवून देऊ आम्ही काय चीज आहे ते. जिथे तुला तक्रार करायचा आहे तिथे कर, ही आमची पहिली आणि शेवटची ताकीद आहे, असे बजरंगला आलेल्या मेसेजमध्ये लिहले आहे. धमकीचा मेसेज आल्यानंतर, बजरंगने तत्काळ सोनीपत बहलगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;