‘कसौटी जिंदगी की’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, ‘पहिल्या नवऱ्याकडून कधी प्रेम…’

‘कसौटी जिंदगी की’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, ‘पहिल्या नवऱ्याकडून कधी प्रेम…’

झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी नवऱ्याची साथ नसताना ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ केला. अभिनेत्रींना प्रोफेशनल आयुष्यात यश तर मिळालं. पण खासगी आयुष्यात मात्र अभिनेत्रींनी अनेक संकटांचा सामना केला. अशाच एका अभिनेत्री पैकी एक म्हणजे अभिनेत्री उर्वशी ढोलकिया…. ‘कसौटी जिंदगी की’ फेम उर्वशी ढोलकिया हिचं वयाच्या 16 व्या वर्षी लग्न झालं. लग्नानंतर वयाच्या 18 व्या उर्वशीने दोन मुलांना जन्म दिला.

उर्वशीचं लग्न एका श्रीमंत उद्योगपतीसोबत झालं होतं. पण लग्नाच्या दोन वर्षांनंतर उर्वशीचं पतीसोबत वाद होवू लागले. त्यानंतर उर्वशीने घटस्फोटाचा निर्णय घेत, दोन मुलांचा सांभाळ ‘सिंगल मदर’ म्हणून केला. आयुष्यात आलेल्या मोठ्या संघर्षानंतर अभिनेत्रीने प्रेमाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं.

उर्वशीचं पहिलं लग्न आणि पहिल्या नवऱ्याबद्दल म्हणाली होती, ‘कधी कोणी माझ्यावर प्रेम केलंच नाही. आज देखील कोणी प्रेम करणारं नाही. मला माहिती माझा पहिला नवरा आता कुठे आणि कोणत्या परिस्थितीत आहे. त्याने कधी मुलांबद्दल विचारलं नाही आणि माझी मुलं कधी त्यांच्या वडिलांना भेटले नाहीत.’ असं देखली अभिनेत्री म्हणाली होती.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by URVASHI (@urvashidholakia)

 

महत्त्वाचं म्हणजे उर्वशीने अद्याप तिच्या पहिल्या पतीचं नाव सांगितलेलं नाही. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीचं नाव अभिनेता अनुज सचदेवा याच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांनी नच बलिये 9 मध्ये आपल्या दमदार डान्सने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

रिपोर्टनुसार, उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेवा यांनी एकमेकांना जवळपास 7 वर्ष डेट केलं. सात वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यामागे कारण देखील फार मोठं होतं. अनुज याच्या कुटुंबियांनी उर्वशी मान्य नव्हती. उर्वशी आता तिच्या दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पहिल्या घटस्फोटानंतर अभिनेत्रीने कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;